NASIK MH: SWACHHATA HI SEVA” CAMPAIGN BY BRAHMA KUMARIS

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय
स्थानीय मुख्य सेवाकेंद्र –
प्रभू प्रसाद, कलानगर, आकाश पेट्रोल पुम्प के पीछे, म्हसरूळ रोड, नाशीक. मो-९३७३२५८४८४
———————————————————————————-

PRESS NOTE

स्वच्छता अभियानाला पदयात्रेने सुरुवात

नाशिक – हम सबने ठाना है, भारत स्वच्छ बनाना है | अशा घोषणा देत दि. ३० सप्टेंबर रोजी भव्य पदयात्रा काढून ब्रह्माकुमारी संस्थेच्या येथील मुख्य शाखे तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद दिला. महापौर रंजना भानसी, नगर सेवक अरुण पवार, शालिनीताई पवार, राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या हस्ते पदयात्रेला शिव ध्वज दाखून सुरुवात करण्यात आली.

परिसरातील विविध मार्गाने पदयात्रा जाऊन समापन पुन्हा मुख्य सेवाकेंद्रातील प्रभू प्रसाद सभागृहात करण्यात आला. या प्रसंगी स्वच्छता अधिकारी निरीक्षक डीबी माळी, गणेश गायकवाड, आकाश साळवे, नाना गांगुर्डे, अण्णा घोंगडे, प्रकाश कच्छाम, महेंद्र चंद्रमोरे आदि महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्तीत होते. पदयात्रेत मोढ्या संखेने ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य उपस्तीत होते. पदयात्रेचे सुयोग्य संचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले.

==================================================

नाशिकरोड ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र तर्फे स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न

नाशिक रोड – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियान आवाहनाला सार्थ प्रतिसाद देत प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय नाशिकरोड सेवाकेद्राच्या राजगिनी शक्तीदिदी याच्या मार्गदर्शनाखाली २८/०९/२०१८ रोजी नाशिकरोड येथील साधकांनी स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला.जेलरोड येथील सेट फिलोमिना स्कूल परिसरात प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या साधकांनी स्वच्छता केली.यात ५० च्या संखेने साधकांनी सहभाग नोंदविला. या प्रसंगी नगरसेविका सौ सीमा ताजने या उपस्थित होत्या.राजयोगिनी ब्रम्हकुमारी गोदावरी दिदींनी सीमा ताजने याचे स्वागत केले. एरवी ज्ञानदान करणार्या ज्ञानगंगा आज सफाई करायला अभियानासाठी रस्त्यावर आल्या होत्या. हे बघून परिसरातील लोकांनी या विशेई कौतुक केले. आपल्या परीसरासोबातच आपल्या मनाची सुध्दा स्वच्छता राबली तर तनाची व परिसराची स्वच्छता आपोआप होत जाईल. यासाठी राजयोग मेडिटेशन शिकण्याची अत्यंत गरज आहे. असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी शक्तीदिदीनी केले.

==================================================

राणेनगर सेवाकेंद्र तर्फे स्वच्छता अभियान

राणेनगर- भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानात २६/०९/२०१८ रोजी राणेनगर येथील सिडको व चौपाटीपासून ते स्टेट बँक चौकपर्यंत आज सकाळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोगिनी ब्रम्हाकुमारी विनादिदी व चंदादिदी समवेत कावेरी बहिण व त्यांच्या सोबत सेवाकेंद्रातील ५० भाऊ-बहिणीनी सहभाग घेतला त्याचबरोबर नगरसेविका सौ छाया देवांग व दिलीप देवांग यांनाही अभियंत उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमात महानगरपालिकेचे आर आर पवार , बी. आर बागुल तसेच अशोक धोंधे व डॉ सुनिता कुमावे यांनीही सहस्य सहभाग घेतला.